उरण : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याचे नियुक्तिपत्र उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिले.
या वेळी आमदार महेश बालदी, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत, कामगार संघटना अध्यक्ष सुधीर घरत, दीपक भोईर, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, उपाध्यक्ष निर्मला घरत, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत, बांधपाडा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, तालुका युवक अध्यक्ष शेखर तांडेल, राजेश ठाकूर, हस्तिमल मेहता, मनोहर सहतिया, अजित भिंडे, मनन पटेल, देवेंद्र घरत, कुणाल समेळ आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.