Breaking News

प्लास्टिक कचर्‍याने गुरांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी

सुधागड पालीतील मोकाट गुरे सध्या आपले खाद्य कचरा कुंड्या व डम्पिंग ग्राउंडवर शोधत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. पालीतील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधलीआळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळपासूनच मोकाट गुरांची गर्दी असते. तेथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात. त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. परिणामी नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात येते. बर्‍याच वेळा टाकून दिलेले अन्न पदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये असते. त्यामुळे गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक तसेच सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अशक्तपणा येतो. कचरा कुंड्या व उकिरड्यावरील कचर्‍यात काहीवेळा घरगुती वापराच्या व इंजेक्शनच्या सुया असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्न नलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते. त्यामुळे गुरे मरतात.

नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. शेतकर्‍यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. त्यांना पेंढा किंवा सुके व ओले गवत खाऊ घालावे.

-डॉ. प्रशांत कोकरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, सुधागड

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply