Breaking News

जासई विद्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासईच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेजमध्ये विश्वमानव, ज्ञानसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंतीनिमित्त विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जयंतीनिमित्त विद्यालयात या महामानवाला मानवंदना देण्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, विद्यालयाचे व्हाईस चेअरमन रामभाऊ घरत, माजी सभापती नरेश घरत, यशवंत घरत, रमेश पाटील, पद्माकर घरत, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, वरीष्ठ लेखनिक डी. के. पाटील, शिपाई राजू भोईर, पांडुरंग मुंबईकर आदी उपस्थित होते.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply