Breaking News

उरण-फुंडे रस्त्यावरील पूल कोसळला; दुचाकीस्वार जखमी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील फुंडे -उरण रोडवरील पूल कोसळला असून, यामध्ये दुचाकीस्वार दिपक कासुकर जखमी झाला आहे. येथील नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने संबंधित जखमीला जेएनपीटी वसाहत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जेएनपीटीतील अन्य तीन बदरांकडे जाणार्‍या कामगार आणि तालुक्यातील फुंडे, जेएनपीटी वसाहत, डोंगरी आणि पाणजे गावाचा उरण शहराशी काहीकाळ संपर्क तुटला आहे. मागील काही वर्षांपूर्वी उरण-फुंडे रोडवरील या पुलाच्या वाजूचा लहान साकव कोसळला होता. हा साकव सिडकोने न बांधता उरण येताना वायू विद्युत केंद्र वसाहतीच्या बाजूने वळसा घेऊन बांधण्यात आलेल्या या पुलावरून वाहतूक सुरू होती, मात्र हा पूल अचानकपणे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पर्यायी मार्ग म्हणून न्हावाशेवा पोलिसांनी वरील संबंधित चारही बदरांकडे मार्गक्रमण करण्यासाठी व तीन गावातील आणि जेएनपीटी वसाहतीतील पादचारी आणि वाहन चालकांना फुंडे गावाच्या पुढील उरण-पनवेल रोड मार्ग देण्याचे सुचविण्यात आले असल्याची माहिती पोलीस हवालदार रोहिणी जाधव यांनी दिली आहे.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply