Breaking News

पनवेलहून गोरखपूर, लखनऊसाठी विशेष गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण

पनवेल : प्रतिनिधी

पनवेलहून गोरखपूर आणि लखनऊसाठी पनवेहून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांसाठी ऑनलाइन आरक्षण सुरू असून जागा असल्यास करंट बुकिंग ही उपलब्ध आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंधांसह संचारबंदी जाहीर केल्यावर परप्रांतीय मजूर मागील अनुभवाने आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे पनवेल रेल्वे स्टेशनवर सकाळपासून रांग लावून बसतात. रेल्वे सुरक्षा बल त्यांना तिकीटपाहून रांगेत बसवून गाडीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर सोडतात. प्रवशांची वाढती गर्दी पाहून रेल्वेने जादा गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. या गाड्या गुरुवारपासून सुरू झाल्या आहेत, पण अनेकांना त्याची माहिती नाही. शुक्रवारी (दि. 16) सकाळी गोरखपूरला जाणारी जादा गाडी रिकामी होती. त्यावेळी रेल्वे कँटीनचे गौतम आगरवाल, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी व तिकीट तपासनीस यांनी दुपारच्या गाडीसाठी लवकर येऊन बसलेल्यांना त्याची माहिती देऊन वेटिंग तिकीट रद्द करून या गाडीचे तिकीट काढून जाण्याचा पर्याय सुचवल्यावर अनेकांनी या गाडीने जाणे पसंद केले.

पनवेलवरून पुढील जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत

1. 17 एप्रिल – (05188) पनवेल-लखनौ : सकाळी 9.15, (01205) पनवेल रक्षूल : 22.00

2. 18 एप्रिल – (05192) पनवेल-गोरखपूर : सकाळी 11.10

3. 19 एप्रिल – (05190) पनवेल-लखनौ : सकाळी  9.15

4. 21 एप्रिल -(05188) पनवेल-लखनौ : सकाळी 9.15  5. 22 एप्रिल – (05190) पनवेल-लखनौ : सकाळी 9.15, (05192) पनवेल-गोरखपूर : सकाळी 11.10

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply