Breaking News

खारघर ओवे कॅम्पमधील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

खारघर ओवे कॅम्पमधील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेत पाणी समस्या सोडविण्यासंदर्भातील निवेदन त्यांना पदाधिकार्‍यांनी दिले.खारघरसारख्या सुसज्ज ठिकाणी वसलेल्या गावामध्ये एक दिवस आड आणि तेही फक्त एक ते दोन तास प्रत्येक घराला पाणी उपलब्ध होते. ऑगस्ट महिन्यामध्ये, पनवेल महानगरपालिकेने एका पत्राद्वारे, सिडको प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे, 50 एमएम घेरा असलेल्या पुरवठा पाईपलाईनमध्ये वृद्धी करून 100 एमएम करण्यास मान्यता पत्र दिल्याने, गावामध्ये लवकरच मोठी पाईपलाईन टाकण्याचे लिखित आश्वासन घोषित केले होते, मात्र दोन महिने उलटले तरीही, हे काम प्रलंबित पथावर आहे. त्यामुळे महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली, बाळासाहेबांची शिवसेने गटाचे शिष्ट मंडळ, व ओवे कॅम्पमधील रहिवाशी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी याबाबतचे निवेदन पत्र सादर केले. शिष्टमंडळामध्ये, महानगर संघटक मंगेश रानवडे, खारघर शहर संघटक  इम्तियाज  शेख,  मुनाफ अमरेली व झोयेब शेख, तसेच ओवे कॅम्पमधून  निवृत्ती सकपाळ व  गणेश रेवणे, या चर्चा सभेमध्ये उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी उपस्थित सर्वांना आश्वासित केले की, लवकरात लवकर ओवे कॅम्प येथील रहिवाशांच्या पाणीटंचाईबाबत तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध राहील.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply