कर्जत : बातमीदार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शांतीदूत मंडळ, रमाबाई महिला मंडळ आणि राज्य रक्त संक्रमण परिषद उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 18) कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले. डिकसळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन किशोर गायकवाड, महिला मंडळ अध्यक्षा रेखाताई साळवी, सागर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुहास शिंदे, नेरळचे पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर, कर्जतचे नगरसेवक राहुल डाळींबकर, आरपीआय रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, उत्तम गायकवाड, उमरोली ग्राम पंचायत सदस्य तेजस भासे, विजय पाटील, प्रसाद भासे, डिकसळ पोलीस पाटील सरिता शेळके, सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर साळोखे आदी उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शांतीदूत मंडळ अध्यक्ष निखिल गायकवाड, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव प्रकाश पवार, समीर गायकवाड, नितिन गायकवाड, शैलेश हिरे, सागर ब्राह्मणे, मनोज गायकवाड, प्रशिक गायकवाड, मदन हिरे, शुभम साळवी, शांताराम भोईर व इतर कायकर्र्यांनी विशेष मेहनत घेतली.