Breaking News

पनवेल महापालिकेकडून नागरिकांना दिलासा

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्ताधारकांच्या करात होणार घट

पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रात 23 ग्रामपंचायती आणि 29 गावांचे समावेशन झालेले आहे. या ग्रामीण भागातील मालमत्तांना महापालिकेने नवीन कर आकारणी करून कराची देयके देण्यात आली होती, पण आकारलेला मालमत्ता कर अवाजवी असल्याने तो कमी करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामीण भागातील नागरिक, प्रकल्पग्रस्त यांनी केली होती. त्यानुसार या भागाचे पुनर्निरीक्षण व करनिर्धारण दुरूस्ती करण्यात आली आहे. नव्या कररचनेमुळे पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात 30-40 टक्कयांची घट होणार आहे.
पनवेल महापालिका स्थापनेपासून प्रथम दोन वर्षे म्हणजे सन 2016-17 आणि 2017-18 या वर्षाकरिता मालमत्ता कर आकारणी पूर्वाश्रमी ग्रामपंचायतीच्या कराप्रमाणेच राहील तसेच सुधारित आदेशामुळे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत क्षेत्र (निवासी गावठाण क्षेत्र), झोपडपट्टी व दाट वस्ती असलेले क्षेत्र व आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या येथील मालमत्ताधारकांच्या करामध्ये 30 ते 40 टक्क्यांची घट होणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी सांगितले.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply