Breaking News

क्रीडा स्पर्धेत रसायनीतील संघाला रौप्यपदक

मोहोपाडा ः प्रतिनिधी

रसायनीतील ट्रॅक अ‍ॅण्ड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या खेळाडूंनी चिपळूण येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी डेरवण युथ गेम्स स्टेट मीट 2022मध्ये 12 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात 4 बाय 100 मीटर रिले विभागात रौप्यपदक जिंकले. या संघात आयु अमोल गीध, दर्शन सचिन करवंदे, प्रेम तिप्पण्णा जाधव व भैयालाल पासवान या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना खडतर स्पर्धा देऊन एक अप्रतिम शर्यत पूर्ण केली. यात निहिरा दिगंबर गीध, आर्वी अनिरुद्ध गीध, अन्वय समीर मोरे, दर्शन सचिन करवंदे, आर्य रामचंद्र पाटील, चैतरंग सचिन मालकर, रूद्र मंगेश पाटील व सुजल दत्तात्रय घरत यांनीही चांगला प्रयत्न केला. या क्लबचे प्रशिक्षक गुरूनाथ म्हशीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply