Breaking News

मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

आमदार महेश बालदी यांचे आवाहन

उरण : वार्ताहर

होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते  दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी (दि. 10) होणार्‍या मानवी साखळी आंदोलनास मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे.

सर्व गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उरण शहरातील, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय संघर्ष समिती यांना आवाहन करताना आमदार बालदी यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे ॠण फेडायचे असतील तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आपण सर्व मानवी साखळी आंदोलनात सहभागी होऊ या.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply