Breaking News

दुकाने सुरळीत ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

कामोठे ः प्रतिनिधी

सलग दोन वर्षे व्यापारी, दुकानदार हे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे परेशान झाले असून दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्ज, खर्च यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून 11 ऑगस्टपासून दुकाने दररोज सुरळीत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कामोठे शहर व्यापारी महामंडळ असोसिएशनने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात सर्व नगरसेवक तसेच भाजप पदाधिकार्‍यांनी व्यापारी व्यापारी असोसिएशनला समर्थन दिले आहे.या वेळी झालेल्या बैठकीस नगरसेवक विकास घरत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम, संजय भूतारे, कैलास सरगर, उत्तम जाधव आणि अनेक व्यापारी उपस्थित होते. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे, रवींद्र जोशी तसेच शहरातील सर्व नगरसेवक-नगरसेविका यांना रवाना करण्यात आली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply