Breaking News

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे सावट

10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या संकटात असणार आहे. यंदा फक्त 10 मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात वारीसंदर्भात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारीचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पायी वारीसाठी यंदाही परवानगी नाकारण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांनाच आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली. प्रत्येक पालखीसाठी 40 वारकर्‍यांना परवानगी असून या पालख्यांना बसमधून जाण्यासाठी 20 बसेस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिंगण आणि रथोत्सवासाठी 10 वारकर्‍यांना परवानगी आहे. पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे देहू आणि आळंदीतून होते. त्या वेळी 100 वारकरीच उपस्थित राहतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. त्याचबरोबर सर्व सहभागी वारकर्‍यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply