नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय योगा दिन सोमवारी (दि. 21) आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पहाटे 6.30 वाजता देशावासीयांना संबोधित करणार आहेत. स्वत: पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ‘21 जून रोजी आपण 7 वा. योग दिवस साजरा करणार आहोत. ‘योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे. सकाळी 6.30 वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमाला मी संबोधित करणार आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदींचे योग दिनानिमित्ताचे भाषण दूरदर्शनसहीत अन्य वाहिन्यांवर लाइव्ह दाखवले जाणार आहे. या वेळी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजूही संवाद साधतील. देशभरात योग दिनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम होणार असून त्यात अनेक मान्यवर भाग घेणार आहेत.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …