भाजपच्या प्रयत्नाने अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामास शुभारंभ
नवी मुंबई ः प्रतिनिधी
नेरूळ सेक्टर 6 सारसोळे गाव आणि गावठाण परिसरात कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर होण्यासाठी पाम बिच सर्व्हिस रोड ते झुलेलाल मंदिर प्रयत्न अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 5) ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आला. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सुजाता पाटील जयश्री ठाकूर यांसह नागरिक उपस्थित होते. या जनवाहिनीसाठी भाजपतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
नेरूळ प्रभाग 34 मधील रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनियमित आणि कमी दाबाने होणार्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती. समस्याचे गांभीर्य ओळखून भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सुजाता पाटील आणि माजी नगरसेविका जयश्री ठाकूर पाठपुराव्यामुळे सारसोळे गाव सेक्टर 6 गावठाण परिसरातील पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. पामबीच सर्विस रोड ते झुलेलाल मंदिरापर्यंत अतिरिक्त जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मोरबे धरणातील जलवाहिनीवरून या ठिकाणी थेट जोडणी देण्यात येणार आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज पाहता परिपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अतिरिक्त जलवाहिनी मधील पाणीपुरवठा उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.
आमदार गणेश नाईक यांच्या महापालिका आयुक्तांबरोबर नवी मुंबईतील नागरी समस्यांवर होणार्या साप्ताहिक बैठकांमधून पाणीसमस्येवील उपाययोजनेसाठी चालना मिळाली. पाणीटंचाईच्या मुद्यावर सुरज पाटील यांनी प्रश्न नेहमीच महापालिकेच्या सभांमधून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. महापालिका आयुक्त आणि संबंधित खात्याच्या अधिकार्यांकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. त्याचेच फलित म्हणून सारसोळे सेक्टर 6 गावठाण परिसरातील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे. एक महिन्यात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास सुरज पाटील यांनी व्यक्त केला.