Breaking News

रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल

असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद कदम

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपद निवडीसाठी कार्यकारिणीची वार्षिक सभा नुकतीच झाली. या सभेमध्ये अध्यक्षपदी शरद कदम यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय डायरेक्ट प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष बिपिनकुमार चहल, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा. डी. बी. साळुंके, अखिल भारतीय असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव प्रा. दीपक मोकल, अखिल भारतीय असोसिएशनचे पंच मंडळ सचिव तथा राज्याचे कोषाध्यक्ष अंकुश पाठक यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कदम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
शरद कदम हे जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष होते, तसेच अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशन पंच मंडळाचे सचिव आणि राज्य संघटक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी जिल्हा व राज्य संघटनावर काम केले आहे व करीत आहेत.
या वेळी बोलताना कदम म्हणाले की, मला अध्यक्षपदाचा मान दिल्याने ही संघटना प्रगतिपथाकडे नेण्याचा माझा मानस आहे. जास्तीत जास्त हॉलीबॉलपटू तयार करून त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करेन आणि प्रत्येक तालुक्यात संघटना तयार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply