Friday , September 22 2023

बैलगाडी शर्यतींचे आयोजन; मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनार्‍यावर बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर या शर्यतींना परवानगी मिळावी अशी स्थानिकांचीही मागणी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे आता गुपचूप या स्पर्धांचे आयोजन केले जाते. दोन दिवसांपूर्वी किहिमच्या किनार्‍यावर अशीच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुल अली यांनी या शर्यतींचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि त्याची तक्रार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली. त्यानुसार मांडवा सागरी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात गाडीवानांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, अशा कुठल्याही स्पर्धा किंवा शर्यती होत नाहीत. केवळ बैलांना सरावासाठी आणले जाते, असे स्थानिकांनी सांगितले.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply