पॅरिस ः वृत्तसंस्था
बार्सिलोना क्लबला अलविदा केल्यानंतर विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणार्या लिओनेल मेस्सीने आता पॅरिस सेंट-जर्मेन क्लबशी करारबद्ध झाला आहे. पुढील दोन वर्षांसाठी तो फ्रान्समधील या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणार्या मेस्सीने काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लबला अलविदा केला. तब्बल 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेस्सी आता चार कोटी 10 लाख डॉलर रकमेला सेंट-जर्मेनशी करारबद्ध झाला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या लीग-1 चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा सेंट-जर्मेन संघ अधिक ताकदवान झाला आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper