Breaking News

‘एसजीटी’च्या शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त

सावित्रीबाई गुलाब तुपे (एसजीटी) संस्थेच्या कामोठे, करंजाडे, डोम्बाला आणि पळस्पे येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पनवेल तालुक्यातील शिक्षणाची गरज लक्षात घेऊन व समाजातील सर्व थरांमध्ये शिक्षण पोहाचविण्यासाठी एसजीटी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश गुलाब तुपे यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसई आणि एसएससी बोर्ड अशा दोन्ही पद्धतीचे विकल्प निवडता येतील अशा शाळा त्यांनी काढल्या आहेत. विद्यार्थ्याना सर्वेतोपरी नव्या युगाच्या सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सेवासुविधा मिळवून देण्यासाठी एसजीटी इंटरनॅशनल स्कुल मॅनेजमेंट, प्रिन्सिपॉल आणि स्टाफ कटिबद्ध राहील.

कामोठे, करंजाडे, डोम्बाला आणि पळस्पे ह्या विभागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता यावी यासाठी शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा, उत्कृष्ट लायब्ररी, खेळाचे साहित्य, कम्प्युटर लॅब, लँगवेज लॅब, स्मार्ट कलासरूम्स, सेपरेट प्लेरूम्स, संपूर्ण इमारतीमध्ये सीसीटीव्ही, उच्चशिक्षित शिक्षकवृंद, प्री-प्रायमरी एअर कंडिशन्ड कलासरूम्स, स्कूल बस सुविधा या सगळ्यांची  सोय करण्यात आली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष रमेश गुलाब तुपे यांनी सांगितले.

स्वातंत्र्य दिनी झालेल्या कार्यक्रमास नगरसेविका संतोषी तुपे, ज्येष्ठ समाजसेवक रवी गोवारी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, शशिकांत भगत, संदीप तुपे, उत्कल घाडगे  आणि कामोठे, करंजाडे, डोम्बाला, पळस्पेमधील अनेक पालक-ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सचिन आवळे यांनी या वेळी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply