Wednesday , June 7 2023
Breaking News

खोपोलीतील सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या; माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

खालापूर : प्रतिनिधी

खोपोलीतील मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याला आणि चौकाला माजी उपनगराध्यक्ष स्व. सरखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी गुरुवारी (दि. 10) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील 50 वर्षे जुन्या रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याचे माजी उपनगराध्यक्ष स्व. सखाराम गेणु जाधव मार्ग व घरासमोरील चौकाचे जाधव मामा चौक नामकरण करून हा परिसर सुशोभीकरण करण्याची  मागणी सुभाष नगर ग्रामस्थांनी 27 डिसेंबर 2019 रोजी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीला समर्थन देत खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे, सुमित्राताई कोळंबे, जयश्री साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत पुरी, तुकाराम जाधव, पुष्पा साबळे, माजी नगरसेवक तुकाराम साबळे, सूर्यकांत देशमुख, काशिनाथ पाटील, लक्ष्मण साळुंखे, कान्हू कोळंबे, शंकरराव सावंत, प्रकाश महाडीक, अंकुश पवाळी, दत्ता वाघमारे, जयेंद्र शेंडे, रामदास रासम, संजय घरडे यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांची बुधवारी भेट घेतली व निवेदन दिले. सखाराम गेणू जाधव हे सलग तीन वेळा खोपोली नगर परिषदेत निवडून आले होते. उपनगराध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती तसेच स्थायी समिती सदस्य अशी पदे त्यांनी भूषवली होती. त्यांचा सन्मान म्हणून मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम गेणू जाधव यांचे नाव देऊन परिसराचे सुशोभीकरण करावे, असे मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी स्व. सखाराम जाधव यांचे चिरंजीव राहुल  जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बावस्कर, विजय तेंडुलकर, विकास खुरपुडेे, शेखर परब, आदी उपस्थीत होते.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply