पंतप्रधानांनी साधला काही बचतगटांशी ऑनलाईन संवाद
मोहोपाडा : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष शासनाच्या आदेशाने देशातील सर्व बचतगटांनी ऑनलाइन साजरे केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही बचत गटांशी ऑनलाइन संवाद साधला. त्याअनुषंगाने रसायनीतील ग्रुप ग्रामपंचायत चांभार्ली येथील धाडसी महिला ग्रामसंघ चांभार्ली यांनी मोठ्या उत्साहात सयुहगान गाऊन थेट प्रक्षेपण करून साजरा केला.
या वेळी महिला व बालकल्याण माजी सभापती तथा विद्यमान सदस्या उमा मुंढे, सरपंच बाळी कातकरी, ग्रामविकास अधिकारी विलास कांबळे, बचत गट अधिकारी मंगेश महाडिक तसेच चांभार्ली गावातील धाडसी महिला संघाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.