Breaking News

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

कर्जत : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्जत तालुक्यात मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी होत असलेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आले होते.  तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

कर्जत तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणत  सभापती सुषमा ठाकरे यांनी ध्वजारोहण केले. या वेळी  माजी सभापती, गटविकास अधिकारी बालाजी धुरी, विस्तार अधिकारी सुनील आहिरे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. नगरपरिषद कार्यालायातील ध्वजारोहण नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड आदींसह नगरसेवक व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 

तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत न्यायालयात न्यायाधीश मनोद तोकले, माथेरान नगरपालिकेच्या आवारात नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, कर्जत  महाविद्यालयात संस्थेचे खजिनदार झुलकरनैन डाभिया, कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, दहिवली येथील जिल्हा परिषद शाळा आणि जनता विद्या मंदिर  येथे माजी आमदार सुरेश लाड, भिसेगावमधील आंबे भवानी माध्यमिक विद्यालयात माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक भोईर,  वरई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुरेश फराट, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात अध्यक्ष परशुराम घारे, यांनी ध्वजारोहण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीताराम मंडावळे, सहकारी भात गिरणीत जयवंत देशमुख यांनी ध्वजारोहण केले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

पळसदरी येथील शाळेत शालेय समितीने दहावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्याच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी आणि बारावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्याच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यंदा प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा पहिला मान बारावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या श्रुती शैलेश निगुडकर हिने मिळविला. तसेच दाहिवली येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या क्रांती शिवाजी मिसळ हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, कार्याध्यक्ष मुकुंद मे, प्रा. नितीन आरेकर, राजेश लाड, रजनी गायकवाड यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (दि, 26) ग्रामपंचायत कार्यालय आणि हुतात्मा चौकात ध्वजवंदन करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीच्या यशोमंगल कार्यालयात सरपंच रावजी शिंगवा यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. त्या वेळी संविधान संवेदिकांचे वाचनदेखील करण्यात आले.

त्यानंतर हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच शंकर घोडविंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला सरपंच रावजी शिंगवा यांनी तर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला उपसरपंच शंकर घोडविंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, राजेंद्र लोभी, धर्मानंद गायकवाड, अतुल चंचे, संतोष शिंगाडे, सदस्या जयश्री मानकामे, शिवाली रासम पोतदार, श्रद्धा कराळे, उषा पारधी, गीतांजली देशमुख, माजी उपसरपंच शिवराम घोडविंदे, बल्लाळ जोशी, माजी सदस्य नितेश शाह, तसेच मिलिंद मिसाळ, बंडू क्षीरसागर, हुतात्मा हिराजी पाटील रहिवासी संघाचे अध्यक्ष संतोष धुळे, नेरळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, कन्या शाळेचे मुख्याध्यापक थोरवे, यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने पाली ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक म्हणून तहसीलदार दिलीप रायन्नावार कार्यभार सांभाळत आहेत. प्रजासत्ताक दिनी पाली ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासक दिलीप रायन्नावार यांनी ध्वजारोहण केले. या वेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply