Tuesday , February 7 2023

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनी वेशभूषा स्पर्धा

पनवेल : वार्ताहर

सालाबादप्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी 15 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी खास भारतमाता आणि स्वातंत्र सैनिक या विषयावर वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याकारणाने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व आले.अरुणाचल प्रदेश इथे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस सेवेत कार्यरत असतांना शहीद झालेले वीर सुनील यशवंत हिरे यांचे बंधु विजय यशवंत हिरे यांच्या हस्ते या वेळी ध्वजारोहण करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेला बच्चे कंपनीने भरगोस प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धेच्या परिक्षणाचे काम लिटल किंडर स्कुलच्या संस्थापक व प्रिंसिपल प्रज्ञा ठक्कर यांनी केले.अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झालेल्या कार्यक्रमात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, सत्यवान पाटील, देविदास खेडकर, तानाजी खंडागळे, प्रदीप देशमुख, उदय पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply