पनवेल महापालिका व सिप्ला कंपनीचा उपक्रम
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका आणि सिप्ला कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरोनामध्ये ज्या महिलांनी आपले पती गमावले अशा 200 एकल महिलांना बुधवारी (दि. 8) जीवनाश्यक धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग समिनी ‘क’च्या सभापती हेमलता म्हात्रे, सिप्ला फाउंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी, सीएसआर मॅनेजर सुनिल मकरे, समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी आदी उपस्थित होते.
रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेला आरटी-पीसीआर किट्स आणि व्हीटीम किट देण्यात आलेले आहेत. आरटी-पीसीआर किट, व्हीटीम किट महापालिकेस कोरोना चाचण्यासाठी अत्यंत उपयोगी पडले आहेत.
सिप्ला कंपनीने कायम महापालिकेला सीएसआर फंडातून मदत केली आहे. या वेळी जीवनाश्यक धान्याचे किट देऊन एकल महिलांना देऊन मदत केली आहे. अशीच मदत त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये केली आहे.