Breaking News

पनवेल मनपा राबवणार महालसीकरण मोहीम

पनवेल : प्रतिनिधी

पल्स पोलिओची दुसरी फेरी 26 सप्टेंबर रोजी होणार असून या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी कार्यदलाची आढावा बैठक बुधवार (दि. 15) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वेळी महालसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली. पल्स पोलिओची दुसरी फेरी 26 सप्टेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोविड लसीकरण वाढविण्याकरिता  खाजगी रुग्णालयांनी आठवड्यातील एक दिवस आपली सेवा महापालिकेला देऊ करण्याविषयी आवाहन करण्यात आले. यंत्रसामग्री, मनुष्यबळ, कोल्ड चेन, लसी, प्रचार यांचे नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. मोहीम राबविण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण बैठकीमध्ये देण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. काटकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. काही दिवसांपासून पनवेल महापालिकेला कोरोना लसींचा  मुबलक  पुरवठा होत असून रोज सुमारे 10-13 हजार लसीकरण केले जात आहे. यामध्ये वाढ करून महालसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी खाजगी प्रॅक्टीशनर डॉक्टरांनी, रुग्णालयांनी एक पाऊल पुढे टाकून आठवड्यातील एक दिवस ठरवून आपली यंत्रणा, मनुष्यबळ, जागा पालिकेला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून एका दिवशी किमान 50 हजारांचे मेगालसीकरण करता येईल. कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. या बैठकीत खाजगी प्रॅक्टीशनर डॉक्टरांना (ज्यांनी खाजगी लसीकरणासाठी परवानगी घेतलेली नाही), रुग्णालयांना आयुक्तांच्या वतीने उपायुक्त सचिन पवार यांनी मदतीसाठी आवाहन केले. याविषयी अधिक माहितीसाठी वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्याशी संपर्क साधवा. वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्याधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी रेहाना मुजावर, वैद्यकीय अधिकारी भक्तराज भोईटे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply