Breaking News

पनवेलमध्ये फूड व्हॅनचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी

कोरोना काळामध्ये तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्न करीत आहेत. याच उद्देशाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अ‍ॅण्ड चायनीज फूड व्हॅन पनवेलमध्ये सुरू केले आहे. या फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अँड चायनीज फूड व्हॅनचे उद्घाटन शनिवारी (दि. 18) मा. नगरसेविका नीता माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेशशेठ ठाकूर,  नगरसवेक राजु सोनी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक बालदन गावंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, मनसेच्या आदिती सोनार, माजी नगरसवेक अच्युत मनोरे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके, सचिव डी. डी. गायकवाड, सल्लागार डॉ. गोरख बोबडे, सहचिटणीस सचिन लोखंडे, सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, तालुकाध्यक्ष कैलास रक्ताटे, सचिव अमित आल्हाट, समाजसेविका नूरजहाँ कुरेशी, चित्रा देशमुख, जस्मिन नजे, आयेशा कुरेशी आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply