Tuesday , February 7 2023

मुरूडच्या प्रसाद चौलकरची राष्ट्रीय किकबॉक्सिंर्गेसाठी निवड

मुरूड ः प्रतिनिधी
सलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून मुरूडसह देशाचे नाव चमकवणारे कराटेपटू प्रसाद प्रकाश चौलकर आता राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत
चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोवा येथे 26 ते 29 ऑगस्टदरम्यान होणार्‍या वाको इंडिया मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांनी राज्याच्या संघात निवड झाली आहे.
कराटे खेळात विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर प्रसाद चौलकर यांनी स्वतः स्पर्धेत सहभागी होणे थांबवले होते, परंतु मधल्या काळात किकबॉक्सिंग या खेळातही नैपुण्य मिळवण्याची इच्छा झाली आणि त्यांनी या खेळाचा सराव करण्यास सुरुवात केली. चौलकर यांना वाको इंडिया किकबॉक्सिंगचे महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार तसेच नवी मुंबईचे पदाधिकारी आशिष राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रसाद चौलकर यांचा एकूण प्रवास इतर युवकांना प्रेरणादायी असून पुढील वाटचालीत ते मोठे यश संपादन करतील, असा विश्वास त्यांचे कराटे प्रशिक्षक सेन्सेई अरुण बोडके यांनी व्यक्त केला.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply