Breaking News

राजस्थानचा पंजाबवर रोमहर्षक विजय

दुबई ः वृत्तसंस्था

आयपीएलमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा दोन धावांनी पराभव करीत रोमहर्षक विजय मिळवला. पंजाबला शेवटच्या षटकात चार धावांची गरज होती, मात्र राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागीने एकच धाव देत आणि दोन विकेट्स घेत सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवला.

राजस्थान रॉयल्सविरोधातील सामन्यात खेळताना पंजाबने त्यांचा विस्फोटक फलंदाज ख्रिल गेलला विश्रांती दिली. पंजाबने एडन मार्कराम, निकोलस पूरन, आदिल रशीद, फॅबियन एलन या चार विदेशी खेळाडूंसोबत खेळण्याचा निर्णय घेतला होता.

नाणेफेक गमावलेल्या संजू सॅमसनच्या संघाने प्रथम फलंदाजी करीत एविन लुईस, यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या योगदानाच्या जोरावर पंजाबला 186 धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने 32 धावांत पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 120 धावांची दमदार सलामी दिली. मयंकने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला 20 षटकात 182 धावाच करता आल्या. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.

शेवटच्या षटकात फिरला सामना

पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी चार धावांची गरज असताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर राजस्थानचा पूरन वैयक्तिक 32 धावांवर बाद झाला त्यानंतर त्यागीने एक चेंडू निर्धाव टाकला. पुढच्या चेंडूवर त्याने दीपक हुडाला यष्टीपाठी झेलबाद केले. एका चेंडूत तीन धावांची गरज असताना त्यागीने फॅबियन एलनला धावच घेऊ दिली नाही आणि राजस्थानने आपला विजय साजरा केला. दुसर्‍या बाजूला असलेला मार्कराम 26 धावांवर नाबाद राहिला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply