Breaking News

पनवेलमध्ये गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 28) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.
या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, तर भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.  
या बैठकीला भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, राजेश्री वावेकर, सीता पाटील, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी लसीकरण कार्यक्रमाविषयी विचारविनिमय करण्यात आला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply