पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागांमधील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत तक्का येथील मोराज संकुलातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळवी ही विनंती नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे आणि नगरसेविका चारुशीला घरत यांना मोराज संकुलातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार गुुरुवारी एकदिवसीय लसीकरण केंद्र सुरू झाले.
कोरोना माहामरीचा प्रभाव कमी झाला असला, तरी सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पनवेल तक्का येथील मोराज संकुलातील नागरिकांनी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे आणि नगरसेविका चारुशीला घरत यांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार गुरुवारी मोराज संकुलातील नागरिकांसाठी एकदिवसीय लसीकरण केंद्र सुुरू झाले असून, या केंद्रामध्ये कोव्हिशील्डची पहिली व दुसरी लस देण्यात येणात आहे. या वेळी माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, वॉर्ड अध्यक्ष रुघुनाथ बहिरा, युवानेते प्रतिक बहिरा, अतुल बहिरा, अफताब ताडे, जीतु खुटकर, मोराज संकुलातील श्री. कदम, बबन कांबळे, शंकर खोत आदी उपस्थित होते.