Breaking News

अनाथ मुले, वृद्धांना मदत करण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये आश्रमात वास्तव्यास असलेल्या अनाथ मुले आणि वयोवृध्द नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची नितांत गरज असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी अनाथ मुले आणि वयोवृध्दांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन खारघरमधील गिरीजा वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12मध्ये असलेल्या गिरिजा वेल्फेअर असोसिएशन संचालित अनाथाश्रमात 30 मुले, तर वृद्धाश्रात 60 वयोवृध्द व्यक्ती राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनाथाश्रम आणि वृध्दाश्रमातील अनाथ मुले, वृध्दांना विविध स्वरुपात मदत करणार्‍या व्यक्तींचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे गिरिजा वेल्फेअर असोसिएशनला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गिरिजा वेल्फेअर असोसिएशन एक साधी संस्था असून, आश्रमातील अनाथ मुले विविध शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे काही मुलांचे शैक्षणिक शुल्कदेखील थकले आहे. याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षासाठी लागणारी पुस्तके, वह्या आणि वार्षिक शैक्षणिक शुल्क याची व्यवस्था गिरिजा वेल्फेअर असोसिएशनला करावयाची आहे. अनाथ मुले आणि वृध्दांच्या मदतीसाठी नागरिक जुने अथवा नवीन कपडे, किराणा सामान, दैनंदिन गरजा भागविणार्‍या वस्तू, शाळेची पुस्तके, शाळेचे शुल्क, वैद्यकीय मदत देणगी देऊन गिरिजा वेल्फेअर असोसिएशनला सहकार्य करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वेबसाइट https://bit.ly/2MT>MI9N> पाहावी अथवा 9769702444 /9819702444 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गिरिजा असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply