Breaking News

कचर्‍याचे नियोजन घरापासून करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी
निरोगी आरोग्यासाठी कचर्‍याचे नियोजन करणे आवश्यक असून, त्याची सुरुवात आपल्या घरातून करावी, असे आवाहन भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.12) नवीन पनवेलमध्ये केले. विकासनिधीतील कामाचे भूमिपूजन आणि सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रमात आमदार ठाकूर बोलत होते.
प्रभाग 17 (नवीन पनवेल) मधील नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या विकासनिधीतून सेक्टर 18 ‘अ’मधील रस्ता काँक्रिटीकरण आणि सोसायट्यांना डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम रविवारी झाला.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाजपचे प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, पप्पू साळवे, यतीन पाटील, वैभव देशमुख, आनंद पवार, नंदा टापरे, ज्योती गुप्ता, मयूरी उनाटकर, रूपेश तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सोसायट्यांचे पदाधिकारी, रहिवासी उपस्थित होते.  आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी विचारपूर्वक नगरसेवक निधीचा वापर केल्याचे सांगून भाजपवर या महापालिका हद्दीतील लोकांनी विश्वास टाकला आहे त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सेवा महापालिकेकडे घेतल्या. त्या वेळी ठेकेदारीसाठी सेवा महापालिकेकडे घेतली, असा आमच्यावर आरोप करण्यात आला, पण महापालिका आणि सिडकोमध्ये फरक असतो. सिडकोवर लोकप्रतिनिधींचा थेट  अंकुश नसतो. त्यामुळे लोकांना चांगली सुविधा मिळावी म्हणून आम्ही सेवा महापालिकेकडे वर्ग करून घेतली. या वेळी त्यांनी कचरा वेगळा करून दिल्यास शहर कसे कचरामुक्त होऊ शकते याची माहिती दिली. त्याचप्रमाणे नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल (सीएए) उपस्थितांना माहिती देऊन त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.  

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply