Breaking News

नरेंद्र मोदी जनहित साधणारे पंतप्रधान; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, पनवेलमध्ये लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करणारा पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या रूपात मिळालेला आहे. आज वयाच्या 70व्या वर्षीही ते तासन्तास झटून काम करतात. त्यांना तुमच्या ताकद, आशीर्वादाची गरज आहे. म्हणजे आणखी 10 वर्षे ते जोमाने काम करतील आणि देशवासीयांचे एकंदर जीवनमान अजून सुधारेल, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 6) येथे केले.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या वाढदिवसापासून ते त्यांच्या संविधानिक कारकिर्दीला 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 7 ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात आलेे. त्या अंतर्गत पनवेल येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जे लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक मनोहर ओझे, पटवर्धन स्मृती रुग्णालय समितीचे राजीव समेळ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या सन्मान सोहळ्यास शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका चारुशीला घरत, रूचिता लोंढे, सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, जिल्हा उपाध्यक्ष गीता चौधरी, राहुल वाहूळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील म्हणजे 15 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत या देशातील गोरगरीब, झोपडपट्टीत राहणार्‍या जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर मिळाले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. भाजपच्या ताब्यातील पनवेल महापालिका महिनाभरात पहिला ठराव आणतेय तो म्हणजे पनवेल महापालिका हद्दीत 2200 घरे आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून देऊ शकणार आहोत. यासाठी जो घरे घेईल त्याला केंद्र सरकार दीड लाख रुपये देते. राज्य सरकारने एक लाख देणे आहे, तर कुष्ठरुग्णांना आणखी दीड लाख केंद्राकडून देण्यात येतात. अशा प्रकारे गरिबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक मनोहर ओझे आणि पटवर्धन स्मृती रुग्णालय समितीचे राजीव समेळ यांनीही आपले विचार मांडले.
स्वच्छ भारत अभियांनांतर्गत शौचालय, प्रधानमंत्री जनकल्याण योजना अंतर्गत रेशन आणि उज्ज्वला गॅस या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन या वेळी सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य महान आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध घटकांसाठी निरनिराळ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ आज देशभरातील लाखो नागरिकांना मिळत आहे.
-जयंत पगडे, अध्यक्ष,पनवेल शहर भाजप

आखलेल्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्ते करीत असतात.
यात भाजप कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर
तर कार्यसम्राट आहेत आणि आपण सर्व जण त्यांच्या पाठीशी आहोत.
-मनोहर ओझे, माजी संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो स्तुत्य आहे. समाजातील तळागाळातील लोकांकरिता पंतप्रधान मोदींनी विविध योजना आणल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत.
-राजीव समेळ, पटवर्धन स्मृती रुग्णालय समिती

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply