Breaking News

वडवळमध्ये महात्मा ़फुले जन आरोग्य योजनेचे कार्डवाटप

खालापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांसह ज्येष्ठ मंडळींना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात देत असताना या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून राजकीय मंडळी व सामाजिक मंडळी पुढाकार घेऊन विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व माहिती व लाभ खालापूर तालुक्यातील नागरिकांना मिळावा या हेतूने भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल रामजी मोरे यांच्या पुढाकाराने घेत रविवारी (दि. 10) खालापूर तालुक्यातील वडवळ प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मोफत कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मंडळीच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. 

हा कार्यक्रम श्रीशिवछत्रपती सभागृह रा.जि.प. शाळा वडवळमध्ये यशस्वीरीत्या साजरा झाला. यासाठी भाजप व विठ्ठल मोरे मित्र मंडळातील सदस्यांनी मेहनत घेतली. या वेळी कोयना पूर्ववसाहत मराठा सेवा संघ ठाणे, पालघर, रायगड जिल्हा अध्यक्ष पांडुरंग साळुंखे, गोदरेजचे तानाजी चव्हाण, वडवळचे सरपंच भगवान वाघमारे, उपसरपंच श्वेता कुंभार, सदस्य अनिल मराजगे, सुर्वणा शिंदे, सचिन मोरे, गायत्री सावंत, प्रमोद सकपाळ, स्नेहा मराजगे, खालापूर पं. स.च्या माजी उपसभापती वत्सला मोरे, माजी अध्यक्ष एम. डी. चाळके, माजी प्राचार्य बेडगे सर, माजी सरपंच जितेंद्र सकपाळ, अनुभव प्रतिष्ठानचे दिलीप आखाडे, डॉ.डेवडीकर, ग्रामसेवक प्रमोद पाटील, लक्ष्मण मराजगे, अनिल मराजगे, महेंद्र सावंत, जगदीश मराजगे, अशोक मराजगे, विलास मोरे, अंकुश मोरे, दत्ता मराजगे, सागर मोरे, सचिन मोरे, भगवान चाळके, उमेश मोरे, विकास मोरे आदींसह गावातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ व या योजनेची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यादृष्टीने वडवळ गावात शिबिराचे आयोजन करीत आहे. या कार्डचे मोफत वाटप केले असून या योजनेचा सर्वसामान्यांना चांगला फायदा होईल आणि उच्च दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होतील.

-विठ्ठल मोरे, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा भाजप

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply