चौक ः चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवारी (दि. 20) विद्या प्रसारिणी सभा चौकचे माजी उपाध्यक्ष कै. विजय महादेव कापरेकर उर्फ तात्या यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती पुंडलिक उर्फ बंधू पाटील यांनी तात्यांच्या पत्नी कै. जयश्री कापरेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमास तात्यांचे जवळचे स्नेही मधुकर दळवी, चिरंजीव राजू कापरेकर, विद्या प्रसारिणी सभेचे उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा, सेक्रेटरी योगेंद्र शहा, मुख्याध्यापक श्री. भोंमले, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, सारंग विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक पंडित पाटील, उपमुख्याध्यापिका पुजारी, पर्यवेक्षक मोळीक, तसेच विद्या प्रसारिणी सभेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …