चार बोटी आणि इतर सामान जप्त
पनवेल ः वार्ताहर
अनधिकृत रेती उत्खनन करणार्या माफियांवर आज पनवेल पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार पथकाने कारवाई करून चार बोटीसह इतर सामान जप्त केले आहे.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती उत्खनन सुरू असून, याची गंभीर दखल घेत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार आज रोड पाली खाडीत धाड टाकून,रेती उत्खनन करून वाहून नेणार्या दोन बार्ज आणि दोन बोटी तसेच सेक्शन पंप जप्त केले त्यात काही रेती ही जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत पनवेल तहसील कार्य क्षेत्रात दहा कारवाया करण्यात आल्या असून,नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल करून पुढे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे कारवाई प्रमुख नायब तहसीलदार मांडे यांनी सांगितले.