Breaking News

सुप्रिया कंपनीने बंद केली गारमाळची वाट

खालापूर : प्रतिनिधी

बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण असणार्‍या  गारमाळ वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणारा शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे प्रकल्प कसा उभा करायचा ते या कंपनीने पाहावे. आमचा कायम वहीवाटीचा शासकीय रस्ता आहे तोच ठेवावा, अशी मागणी गारमाळ ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत खालापूर तहसील कार्यालयात तक्रार दाखल करीत सुनावणी झाली असता पुढील सुनावणीसाठी 22 तारीख दिली आहे.

गारमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असल्याने   येथील जमिनी खरेदी करून सध्या काम करणार्‍या सुप्रिया फार्मस या बांधकाम कंपनीमार्फत बंगलो सिस्टीम केली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणच्या धनिकांनी हे बंगले खरेदी केले आहेत. व्यवसायात ग्राहकांना अडचण करीत असलेला जिल्हा परिषदेचा रस्ता ज्यावर नागरिकांना जाण्या येण्याची सुविधा असून या 500 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनी विरोधात एकवटून आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र कंपनीकडून या रस्त्याबाबत परवानगी घेऊन काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply