Breaking News

ऋतुराजचे पुण्यात जल्लोषात स्वागत

पुणे ः प्रतिनिधी

आयपीएल 2021 स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मने जिंकली. ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याचे रविवारी (दि. 17) पुण्यात आगमन झाले. या वेळी पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत त्याचे जल्लोषात स्वागत केले. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या 16 सामन्यांत 635 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण 64 चौकार आणि 23 षटकार ठोकले. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएल 2021 आणि करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून ऋतुराज पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या घरी परतला. तो गाडीतून रिकाम्या पायाने उतरला. परंपरेनुसार कुटुंबातील सदस्यांनी ऋतुराज ओवाळले. त्याचे पाय धुतले. या वेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहर्‍यावर अभिमान झळकत होता. नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply