Breaking News

नेरळ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; स्कायवॉक, पादचारी पूल, सरकते जिने व अन्य सुविधांची तरतूद

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला  असून, त्यात स्काय वॉक, दोन नवीन पादचारी पूल, सरकता जिना, प्रवाशांसाठी निवारा शेड आदी बर्‍याच कामांचा समावेश आहे. नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक असून या स्थानकातून माथेरानकरिता मिनिट्रेन सोडली जाते. या मिनिट्रेनचा मार्ग, इंजिने आणि या नॅरोगेज मार्गावरील स्थानके यांना युनोस्कोचा हेरिटेज नामांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा, यासाठी रेल्वे बोर्डाने आराखडा तयार केला आहे. नेरळ स्थानकात मुंबईच्या दिशेकडे नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून तो पूल थेट टॅक्सी स्टँडजवळ जोडला जाणार आहे. या पादचारी पुलामुळे स्थानिकांना स्थानकातून प्रवास टाळता येणार आहे. तर कर्जत दिशेकडे एक पादचारी पूल निर्माण केला जाणार आहे. फलाट एक आणि दोन यांना जोडणारा हा पूल थेट नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला पार्किंगमध्ये उतरणार आहे. स्कायवॉक पद्धतीने हा पूल प्रवाशांना थेट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणून सोडणार आहे. याशिवाय स्थानकात प्रवासी निवारा शेड उभारली जाणार आहे. पावसाळ्यात नेरळ गावातील पाणी वाहून जाण्यासाठी मध्य रेल्वे मोठा नाला बांधून देणार आहे. नियमीत वाहतूक कोंडी होत असलेल्या नेरळ पाडा गेट येथे सब-वे बांधता येईल का? याची चाचपणीदेखील मध्य रेल्वेचे अभियंत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.  नेरळ स्थानकाचा कायापालट करण्यासाठी मध्य  रेल्वे करोडो रुपयांचा निधी खर्च करणार असून, या आराखड्याला मार्च 2021मध्ये अंतिम रूप येणार आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply