Breaking News

देशाला फसवणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे -मोदी

नवी दिल्ली ः देशाची फसवणूक करणार्‍यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो. जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करताना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदेमध्ये आभासी कार्यक्रमाद्वारे अधिकार्‍यांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात 2014 आधीच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर पंतप्रधान मोदींनी टीका केली. याआधी सरकारमध्ये भ्रष्टाचारविरोधात कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची कमतरता होती, मात्र गेल्या सहा सात वर्षांत विविध पावले उचलत भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग आम्ही बंद केले, असे ते म्हणाले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply