Breaking News

मविआ सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले; जागर अभियान मेळाव्यात फडणवीसांचा हल्लाबोल

ठाणे ः प्रतिनिधी

राज्यात ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. ओबीसींना न्याय मिळत नाही, तोवर भाजप गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 20) राज्य सरकारला दिला. भाजपच्या ठाणे-कोकण विभागीय ओबीसी जागर अभियान मेळाव्यात ते बोलत होते. ठाण्यातील टीप टॉप प्लाजा येथे झालेल्या या मेळाव्याला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सर्वश्री किसन कथोरे, गणपत गायकवाड, कुमार आयलानी, नरेंद्र पवार, संजय केळकर आदी उपस्थित होते, तर रायगड जिल्ह्यातून भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा पनवेल शहर मंडल अध्यक्ष रामनाथ पाटील, ग्रामीण मंडल अध्यक्ष आप्पा भागित, खोपोली शहर मंडल अध्यक्ष सुनील नांदे, भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवी जोशी, भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, हिंदू रक्षा मंचच्या बिना गोगरी, वैशाली प्रजापती यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात गेले नाही, तर केवळ महाराष्ट्रात गेले आहे. इम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यातसुद्धा बुद्धिभेद केला जात आहे. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी इम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकार मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय होतोय. तो दूर व्हावा यासाठी हे ओबीसी जागर अभियान आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply