Breaking News

निवृत्त सैनिकाचे पळस्पे गावात स्वागत

खारघर : प्रतिनिधी

भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुजीत किसन हातमोडे यांची मंगळवारी (दि. 1) पनवेलमधील पळस्पे गावात जंगी स्वागत करीत गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. या वेळी गावातील अबालवृद्ध या सोहळ्यात सहभागी झाले होते.

अहमदनगर याठिकाणी ट्रेनिंग घेतल्यानंतर सुजित हातमोडे (वय 38) भारतीय सैन्य दलात दाखल झाले. बबिना रेंजमेंटमध्ये हातमोडे यांचा भारतीय सैन्य दलातील प्रवास सुरू झाला. या वेळी 19 वर्षांच्या कारकिर्दीत हातमोडे यांनी देशात विविध राज्यात आपले कर्तव्य बजावले. यामध्ये राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पटियाला आदींचा समावेश आहे. सैन्य दलाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व घातक समजल्या जाणार्‍या काश्मीर मध्येदेखील बर्फाळ प्रदेशात हातमोडे यांनी आपले कर्त्यव्य बजावले. या काळात अनेक वेळा दहशतवाद्यांशी चकमकदेखील उडाल्याचे सुजित हातमोडे यांनी सांगितले. निवृत्तीनंतर पळस्पे ग्रामस्थांनी केलेला सन्मान खरोखरच विस्मरणीय असल्याचे हातमोडे यांनी सांगितले.

पळस्पे गावातील ग्रामस्थ या सोहळ्यात सहभागी झाले होते. गावातील तरुण देशाची सेवा करून निवृत्त होत आहे. हे आमच्यासाठीदेखील अभिमानास्पद गोष्ट असल्याचे पळस्पेतील ग्रामस्थ चंद्रकांत भगत यांनी सांगितले. सैन्यदलातील सेवा बजावताना कुटुंबीयांना मोलाची साथ दिली. ग्रामस्थांनी दिलेला प्रेम अविस्मरणीय असल्याचे सुजित हातमोडे यांनी सांगितले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply