भुवनेश्वर ः वृत्तसंस्था
भुवनेश्वर येथे 24 नोव्हेंबरपासूर सुरू होणार्या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विवेक सागर प्रसाद करणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. याआधी 2016मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले होते. भारतीय संघात कर्णधार विवेक सागर प्रसादसह संजय (उपकर्णधार) शारदानंद तिवारी, प्रशांत चौहान (गोलरक्षक), सुदीप चिर्माको, राहुल कुमार राजभर, मनदर सिंग, पवन (गोलरक्षक), विष्णुकांत सिंग, अंकित पाल, उत्तम सिंग, सुनील जोजो, मनजीत, रविचंद्र सिंग मोइरंगथेम, अभिषेक लाक्रा, यशदीप सिवाच, गुरुमुख सिंग, अराईजीत सिंग हुंदाल यांचा समावेश आहे.