उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.
प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आमोद ठक्कर ह्यांनी केले. ते म्हणाले आपल्या भविष्यासाठी आपल्याला विकास हवा आहे, पण तो विकास शाश्वत विकास असावा, म्हणून आपणच पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन रेंज फॉरेस्ट ऑफिसर रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री. कोकरे उपस्थित होते. ते म्हणाले, उरणसाठी नुकतेच 1000 हेक्टर क्षेत्र मंजूर झालेले आहे. आता ते विकसित करायची सुरुवात लवकरच होईल.
प्रमुख वक्त्या निमिषा नारकर कांदळवन कक्ष अलिबाग यांनी कांदळवन सध्य परिस्थिती, त्यांची सागरी जैव वैविध्यता टिकविण्यासाठीची आवश्यकता, जमिनीची धूप थांबविणे, प्राणवायू मोठ्या प्रमाणात पुरविणे, औषध म्हणुन गुणधर्म इत्यादी अनेक प्रकारे मानवाच्या कसे उपयोगी आहेत हे सांगितले. तसेच त्यांचे संरक्षण कसे करता येईल आपण काय करू शकतो व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना आहेत, त्यांची अमलबजावणी कशी केली जाते ह्याची तपशीलवार माहिती दिली.
समुद्री जीव व इतर चिंताजनक संख्या असलेले वन्य जीव ह्यांची माहिती विराज दाभोळकर ह्यांनी करून दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माननीय प्राचार्य डॉ. पी. जी. पवार ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पाहुण्यांची ओळख डॉ. श्रेया पाटील यांनी करून दिली. प्रा. पंकज भोये ह्यांनी सर्वांचे आभार मानले, डॉ. आर. बी. पाटील ह्यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मयुरी मोहिते, प्राणिशास्त्र विभागच्या विद्यार्थ्यांनी व किशोर जोशी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.