Breaking News

पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतात दिवाळीची सांगता

मुंबई ः प्रतिनिधी

टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानची सुपर 12 फेरीत विजयी घोडदौड सुरूच होती. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते, मात्र पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव होताच सोशल मीडियावर मीम्सना उधाण आले. ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यापूर्वी सुपर 12 फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केल्याने काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply