Breaking News

यंदाही गाव जत्रांवर कोरोनाचे सावट

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील गावा-गावांत गावजत्रांचा हंगाम सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून, चैत्र महिन्यात अनेक गावांत ग्रामदैवतांच्या जत्रा आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी जत्रांवर सावट आहे. त्यामुळे जत्रांमध्ये गावोगावी होणार्‍या आर्थिक उलाढालीच्या अर्थकारणाला यंदाही फटका बसणार आहे, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार्‍या कलाकारांप्रमाणेच विविध वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

साधारण दोनशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या जत्रा उत्सव सलग दुसर्‍या वर्षी खंडित झाली आहे. नवी मुंबईतील गावजत्रांचा हंगाम हा एकविरा देवी पालखी सोहळ्या पासून सुरू होतो. त्यानंतर बेलापूर पासून दिघ्यापर्यंत असणार्‍या गावागावात जत्राचा हंगाम सुरू होतो. गेल्यावर्षी कोरोनामुळे शासनाने तसेच मनपा प्रशासनाने जत्रा उत्सव साजरे न करण्याचे आवाहन प्रत्येक गावकीच्या सदस्यांना केले होते. त्यानुसार गावकी कडून अगदी साधेपणाने घरातच देवीचा मान देत पूजा अर्चना केली होती, मात्र आतादेखील अशाच प्रकारे जत्रा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार असल्याचे ग्रामस्थ मंडळा कडून सांगण्यात आले. कोरोनामुळे मागील पाच ते सहा पिढ्यांपासून सुरू असणार्‍या जत्रा उत्सवाला रद्द करण्याची नामुष्की ग्रामस्थ मंडळावर ओढवली आहे. नवी मुंबईत प्रत्येक गावात गावदेवीची जत्रा भरली जाते.

जत्रा म्हटली की जत्रेच्या एक दिवस आधी देवीचा जागर असतो त्यामध्ये पारंपरिक बायांची गाणी गायली जातात. जत्रेच्या दिवशी गाव देवांना, गावातील ग्राम दैवत आधीना मान देण्याची प्रथा आजही अखंडितपणे सुरू आहे. जत्रा म्हंटली की आकाश पाळणे, मिठाईची दुकाने, साज श्रुंगाराची दुकाने आदी आलेच पन गेल्या वर्षी जत्रांच्या काळात कोरोनाचे वातावरण राहिल्याने सर्व गावांच्या जत्रा साध्या पद्धतीने साजर्‍या झाल्या. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने निर्बंध लागू यंदाही जत्रा, यावर बंदीचे आदेश  त्यामुळे जत्रादेखील फक्त साधेेेपणाने साजर्‍या होणार आहेत.

कोरोनामुळे याही वर्षी जत्रा उसत्व साजरा करणार तो ही अगदी साधेपणाने घरातल्या घरातत. याशिवाय सामाजिक अंतर ठेवून गावदेवीचे दर्शन घेतले जाणार आहे.

-साईनाथ पाटील, ग्रामस्थ, तुर्भे

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply