
पनवेल : वार्ताहर
पनवेलमधील सुकलेले पामचे झाड आणि विद्युत वहिनीवर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
प्रभागातील समस्यांचे निरसन करण्यास नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच तत्पर असतात. स्वतः जातीने हजर राहून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील याकडे यांचा जास्त कल असतो. नागरिकांना समाधान मिळावे हाच त्यांचा ध्यास आहे. माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सुकलेले पामचे झाड आणि विद्युत वहिनीवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडून घेतल्या व त्वरित कापलेले झाड आणि फांद्या उचलून घेण्यास सांगितले. त्यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी रितसर महापालिका आणि महावितरणच्या अधिकार्यांशी बोलून आणि पत्र व्यवहार करून काम करून घेण्यात आले.