Breaking News

जयपूरच्या कला महोत्सवात कर्जतच्या हर्षदा कडूची चित्रे

कर्जत ़: प्रतिनिधी

प्रतिभा एज्युकेशनल डेव्हलपमेंट रिसर्च सोसायटीच्या वतीने जयपूरमध्ये सध्या कला महोत्सव सुरू आहे. या कला महोत्सवात कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील उदयोन्मुख चित्रकार हर्षदा संजय कडू हिच्या चित्रांचा समावेश आहे. कर्जतमधील अनेक चित्रकारांची चित्रे देशविदेशात गेली आहेत. मात्र महिला चित्रकाराची चित्रे अन्य राज्यात जाण्याची ही पहिलीच घटना आहे.

कर्जत तालुका म्हणजे चित्रकारांची खाण. जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांची चित्रे काही वर्षांपासूनच सातासमुद्रापार पोहोचली आहेत. त्यांच्या चित्रांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अगदी सातवी पास शेतकरी हरी फुलावरे, मत्स्य व्यावसायिक किसन खंडोरी, चिक्की व्यवसायिक सुनील परदेशी, दगड खाणीचे व्यवसायिक राजन दगडे असे अनेक चित्रकार कर्जतमध्ये आहेत. पोसरी गावातील हर्षदा कडू हिनेसुद्धा आपली कला विकसित केली आहे. तिने चित्रकलेचे धडे ऊर्मिला दुर्गुडे यांच्याकडून घेतले. हर्षदा हिची चित्रे जयपूरच्या प्रदर्शनात झळकली आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply