रसायनी : प्रतिनिधी : धनगर समाजाचे आराध्य दैवत आणि बोरघाटाचे जनक असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शिंग्रोबा देवाची पालखी मिरवणूक वाजतगाजत यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने उत्साहात पार पडली. या वेळी आमदार बाला भेगडे आणि माजी आमदार देवेंद्र साटम उपस्थित होते. शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता मंदिरात धनगर समाजाचे नेते बबन खरात यांच्या हस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा झाली. 10 वाजता मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे व माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीचे पूजन करून पालखीला सुरुवात करण्यात आली. ही पालखी शिळफाटाहून खोपोली अशी काढून शिंग्रोबा देवस्थान मंदिरापर्यंत नेण्यात आली. या वेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा आणि भाविक भक्तांचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार बाळा भेगडे, माजी आमदार देवेंद्र साटम, चौक जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, नगराध्यक्षा सुमन औसरमल, नगरसेविका प्रमिला सुर्वे, सुनील पाटील, शिंग्रोबा उत्सव कमिटी संस्थापक बबन खरात, बबन शेडगे, दीपक आखाडे, बाळू आखाडे, अध्यक्ष भरत कोकरे, उपाध्यक्ष नामदेव हिरवे, सचिव लक्ष्मण बावादाने, खजिनदार बबन जानकर, सदस्य बापू बावादाने, दत्ता बावादाने, बाळू आखाडे, अरविंद गोरे, सतीश गोरे, सुधागड तालुका धनगर समाज अध्यक्ष गंगाराम कोकळे, सचिव अनंता हिरवे, पेन तालुका अध्यक्ष राजू आखाडे आदींसह अनेक मान्यवरांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …