पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरचे सुधीर चाकोले यांनी समाजामध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते वाघा बॉर्डर आणि पुन्हा गेटवे ऑफ इंडिया असा सुमारे चार हजार किमीचा प्रवास करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्यांनी मुंबई येथून प्रवासाला सुरुवात केली. या वेळी त्यांना प्रेसिडेंट रवी नाईक, क्लब ट्रेनर अविनाश कोळी, मुकुंद चौधरी, पुरनसिंह नेहरा व अन्य सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. सध्या त्यांचा प्रवास राजस्थान येथे सुरू आहे. प्रत्येक शहरात रोटरी क्लबतर्फे सुधीर चाकोले यांचे स्वागत करण्यात येत आहे.