Breaking News

जेएनपीटी विद्यालयातील पालक व शिक्षकांच्या मागण्या मान्य

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटी येथील आरकेएफ या संस्थेच्या सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी दि. 20 डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. यामध्ये मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबतची नियमबाह्य नोटीस त्वरित मागे घ्यावी आणि शासन निर्णयाप्रमाणे बंधनकारक असणार्‍या इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि. 24) बेमुदत धरणे आंदोलनाना यश आले असून शिक्षक व पालकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

दि. 18 डिसेंबर 2021 रोजी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना कोणतेही सबळ कारण नसताना सक्तीच्या रजेवर पाठविले होते, तसेच विनाकारण सहा शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना अडीच वर्षाचा पगारदेखील देण्यात आलेला नव्हता. एकूण 114 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अशी बेकायदेशीर अनधिकृत कारवाईची टांगती तलवार उभी होती. या घटनेमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्गात असंतोष निर्माण झाला होता. याचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गाने 20 डिसेंबर 2021 पासून शाळेच्या गेटसमोरच बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली होती.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply